लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: नाशिक शहरातील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा उद्धव सेनेकडे गेल्याचे वृत्त आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी नाशिक पश्चिम मतदार संघातील इच्छुक उमेदवार सुधाकर बडगुजर आणि मध्य नाशिकमधील इच्छुक उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना तातडीने मुंबईला बोलावून घेण्यात आले. त्यांना बुधवारी (दि.२३) ए बी फॉर्म देण्यात येणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षनेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अद्याप नाशिकमधील या दोन्ही जागांचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. यासंदर्भात बुधवारीच (दि.२३) अधिक स्पष्टता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक आहेत. नाशिक पश्चिममध्ये काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी आणि माकप प्रयत्न करत आहेत तर मध्यमध्ये उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तिघांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. अन्य अनेक जागांवर एकमत झाले असले तरी या जागेबाबत मात्र एकमत होत नसल्याने तिन्ही पक्ष जागेची मागणी करत आहेत. दरम्यान, असे असले तरी उद्धव सेनेला हे दोन्ही जागा सुटल्याचे उद्धव सेनेने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. मध्य नाशिकमधील इच्छुक उमेदवार वसंत गीते आणि नाशिक पश्चिममधील उमेदवार सुधाकर बडगुजर यांना मुंबईत ए बी फॉर्म घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. मंगळवारी रात्री दोघेही तेथे पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेण्यात आली. मात्र, बुधवारी (दि. २३) दुपारी उद्धव सेनेतील सर्व उमेदवारांना एकाच वेळी ए, बी, फार्म देण्यात येणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.
आज काय ते ठरणार...
काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षनेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अद्याप नाशिकमधील या दोन्ही जागांचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. यासंदर्भात बुधवारीच (दि.२३) अधिक स्पष्टता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीत पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिकमधील उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आक्रमक आहेत.