राम देशपांडे
नाशिक : मूलभूत प्रश्न कायम असल्यामुळे विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी नेमका खर्च झाला तरी तरी कुठ कुठे असा प्रश्न इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघातील मतदारांना पडला आहे. २ लाख ७९ हजार १८६ मतदार असलेल्या या मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे. त्यात प्रामुख्याने विद्यमान व माजी आमदारांमध्ये 'काटेकी टक्कर' पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघाचा आढावा घेतला असता रस्ते, पाणी, आरोग्य अशा अनेक मूलभूत सुविधांअभावी समस्यांचा सामना करणारे मतदार कोणाला निवडणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
इगतपुरी मतदारसंघात १७ उमेदवार उभे आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदासंघात यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या निर्मला गावित यांनी २००९ व २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरच आमदारकी मिळवली होती. मात्र २०१९ मध्ये शिवसेना प्रवेशानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हिरामण खोसकर यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करीत निर्मला गावितांना पराभूत केले. आता खोसकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळविली आहे. काँग्रेसकडून लकी जाधव हा नवीन चेहरा समोर आला आहे. या चौरंगी लढतीतील चौथा चेहरा म्हणजे काशिनाथ मेंगाळ, २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी मिळवल्यानंतर सलग दोनदा म्हणजे २००९ व २०१४ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर यंदा पुन्हा ते मनसेच्या तिकिटावर रिंगणात आहेत.
आतापर्यंतच्या सर्व आमदारांनी विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. मात्र विकासाची गंगा नेमकी वाहिली तरी कुठे? असा प्रश्न मतदारांना पडला आहेत. कारण १९५२ पासून भेडसावणारा पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. पावसाचे माहेरघर असलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर हे दोन्ही आदिवासीबहुल तालुके अजूनही तहानलेले आहेत.
धरणांचा आतापर्यंतच्या सर्व आमदारांनी विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. मात्र विकासाची गंगा नेमकी वाहिली तरी कुठे? असा प्रश्न मतदारांना पडला आहेत. कारण १९५२ पासून भेडसावणारा तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. धरणांमध्ये मुबलक जलसाठा असूनसुद्धा इगतपुरी शहरातील अनेक नागरिकांची तहान रेल्वे स्थानकांवरील नळ भागवतात. अनेक आदिवासी वाडी वस्त्यांकडे नेते फिरकलेच नसल्याने त्यांच्या समस्यांचा डोंगर मोठा झाला आहे. पाऊस असूनही पाणी अडवता आले नाही. वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नाहीत.
एसटी महामंडळानेही पूर्णतः डोळेझाक केली आहे. यामधून अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळते. नागरिकांना मिळेल त्या वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागतो. बहुतांश ठिकाणी प्रवासी निवारे नाहीत. असलेल्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते झाले खरे, मात्र त्या रस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वाडी-वस्त्यांवर राहणाऱ्यांना किमान ३ ते १० किमी पायी चालत यावे लागते. अशात गर्भवती महिलांसह आजारी व्यक्तीचा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत जीव कंठाशी आलेला असतो.
मतदारसंघात इगतपुरी आणि त्र्यंबक दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधांची वानवाच आहे. अनेक केंद्र कर्मचाऱ्यांअभावी ओस पडलेली आहेत, सुस्थितीत सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांवर उपचारांसाठी लोकांची गर्दी होते. इगतपुरी शहरासह मतदारसंघातील घोटी, वाडीव-हे, कवडदा, गोंदेदुमाला, त्र्यंबकेश्वर शहर, हरसूल, देवगाव, वेलूंजे, बोरीपाडा, ठाणापाडा, चिखलपाडा, हरसूल, नांदूरकीपाडा आदींसह वाळविहीर, कन्हाळे, वैतरणा, सातुर्ले, पहीने, आहुर्ली, सामुंडी, पत्र्याचा वाडा, धाडोशी, झोलेवाडी यांसह यांसह अनेक वाडी-वसत्यांवर राहणाऱ्यांना येत्या काळात नेत्यांनी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या इतकीच अपेक्षा आहे. ती कधी पूण; होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
योजनांपासून नागरिक वंचित
महायुती शासनाने मोठ्या प्रमाणात योजनांचा पाऊस पाडला. मात्र इगतपुरी मतदारसंघातील अनेक नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आदींपासून अनेकजण वंचित असल्याचे चित्र आहे.