शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:34 AM

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए एकसारखाच असल्याचे आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत भुजबळ कुटुंबीयांना कुणी अडचणीत आणू पाहत असेल तर त्याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत नांदगावमधूनसमीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.

छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. यावर छगन भुजबळ शुक्रवारी येवला येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, अशा अनेक पुतणे कंपनीने आपल्या काकांचे ऐकलेच आहे, असे वाटत नाही. राजकारणात या पुतणे कंपनीचा डीएनए वेगळाच आहे. 

‘ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात...’

  • नांदगावमध्ये सुहास कांदे भुजबळ कुटुंबीयांवर खोटे आरोप करत आले आहेत. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयाला अडचणीतून जावे लागत आहे. महायुतीत असूनही कांदे यांनी आरोप चालवले आहेत. त्याचा भुजबळ कुटुंबीयांना कुठे तरी विचार करावा लागेल.
  • समीर भुजबळ यांनी किती दिवस आता माझ्याकडे विचारणा करायची? त्यांचीही हाफ सेंच्युरी झालेली 
  • आहे. राजकारणात कुणाशी कसे लढायचे अथवा कुणाशी कसे जुळवून घ्यायचे, याचा राजकीय अभ्यास त्यांचा आहे. त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे सांगत भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे समीर भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nandgaon-acनांदगावSameer Bhujbalसमीर भुजबळChhagan Bhujbalछगन भुजबळShiv Senaशिवसेनाnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक