परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:57 AM2024-11-05T09:57:13+5:302024-11-05T09:57:21+5:30
महानगराच्या विकासाची दृष्टी असलेल्यांना विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे पक्ष नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
नाशिक: पश्चिम विधानसभा मतदार संघात यावेळी परिवर्तन घडविण्याचा तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आण्णा पाटील, लक्ष्मण जायभावे, दत्ता पाटील, वसंत ठाकूर, विजय पाटील, वंदना पाटील, मुन्ना ठाकूर, नाना भामरे, धोंडीराम आव्हाड, धोंडीराम बोडके, मीराताई साबळे, कैलास कडलग, संतू पाटील जायभावे, देवेंद्र देशपांडे, इमरान अन्सारी, देवराम सैंदाणे, सोमनाथ सूर्यवंशी, अजय गोवर्धने, चेतन फेगडे, सुरेश जाधव, सुभाष पाटील, सूरज चव्हाण, अर्जुन देवरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सचिन राणे, संजय भामरे, सुभाष गायधनी, नाना पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
सातपूर आणि अंबड येथील औद्योगिक विकासालाही खीळ बसली आहे. अनेक कारखाने बंद पडल्यामुळे कामगारांवर स्थलांतराची वेळ आली आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प आणण्यासाठी महानगराच्या विकासाची दृष्टी असलेल्या सुधाकर बडगुजर विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे पक्ष नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.