नाशिक: नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या गणेश गिते यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेत भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना आव्हान दिले आहे. या लढतीत मनसेचे प्रसाद सानप यांच्या उमेदवारीने तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
१५ उमेदवारांपैकी केवळ भाऊसाहेब निमसे व नीलेश मगर या दोघा अपक्षांनीच माघार घेतल्याने एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मतदारसंघात १९ उमेदवारांनी २७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात, चौघांचे अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर १५ उमेदवार रिंगणात होते. माघारीच्या अंतिम दिवशी सोमवारी अपक्ष भाऊसाहेब निमसे, नीलेश मगर या अपक्षांनी माघार घेतली. मनसेचे उमेदवार सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे.
रिंगणातील उमेदवार
अॅड. राहुल ढिकले (भाजप), गणेश गीते (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), प्रसाद सानप (मनसे) करण गायकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), प्रसाद जमखिंडीकर (बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत थोरात (आझाज समाज पार्टी कांशीराम), अॅड. दत्ता अंभोरे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), प्रसाद बोडके (राष्ट्रीय समाज पक्ष), जितेंद्र भाभे (निर्भय महाराष्ट्र पार्टी), रवींद्रकुमार पगारे (वंचित बहुजन आघाडी), कय्युम कासम पटेल, कैलास चव्हाण, गणेश गिते (अपक्ष) माघार घेतलेले उमेदवार : भाऊसाहेब निमसे व नीलेश मगर (अपक्ष)