कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला होता. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत होती. परंतु सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी पुण्यातही डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण सापडले होते.
नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी २८ हे ग्रामीण भागातील आहे. या लोकांचा रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार या लोकांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.