- दत्ता दिघोळे नाशिक - पाणी फाउंडेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळा बरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले.संपुर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पुर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशनच्या किरण राव यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामावर श्रमदान करण्यासाठी राव आल्या असता त्यांनी जल मित्रांचे काम बघुन त्यांनी ते करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्यांनी विश्वास व्यक्त केला.दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण लोकांच्या बरोबरीने शहरातील लोकांचा वाढता ओघ बघुन खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेने ही चळवळ पाऊल टाकत असल्याचा विश्वास किरणराव यांनी उपस्थित श्रमिकां बरोबर केलेल्या चर्चेत व्यक्त केला.
पहाटे सहा वाजेच्या दरम्यान किरण राव यांचे सत्यजित भटकळ यांच्या बरोबर कोनांबेच्या माळरानावर आगमन झाले.यावेळी त्यांच्या बरोबर अभिनेत्री अनिता दाते,विश्वसुंरी शिल्पी अवस्ती आदींनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन आलेल्या श्रमजिवींच्या बरोबर श्रमदान करत उपस्थिती जलमित्रांचा उत्साह वाढवला.
सुमारे तीन तासात झालेल्या श्रमदानातुन कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची भुजल पातळीत साठवन होईल एवढे काम महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झाल्याचे फाउंडेशनचे सदस्य व जलमित्रांनी सांगितले .