नाशिक : कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धांमधून केवळ विद्यार्थीच घडले असे नाही तर महाराष्टÑाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे आयोजन नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते. या एकांकिकेच्या उद्घाटन सोहळ्यात खांडकेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे होते. व्यासपीठावर सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव, प्रसाद कुलकर्णी, ऋषिकेश पुरोहित, संस्थास्तर एकांकिका प्रमुख सुधीर फडके, परीक्षक श्रीराम वाघमारे, नीलेश घोरपडे, पल्लवी ओढेकर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व श्रीमती र. ज. चौहान (बि) गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ यांनी केले. परीक्षकांचा परिचय हेमंत देशपांडे यांनी करून दिला. आभार कामिनी पवार यांनी मानले.कार्यक्र मानंतर नाशिकरोड संकुलातील पुढील एकांकिका सादर करण्यात आल्या.नवीन मराठी शाळा (घर २१ व्या शतकातले), कै. जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल (अशी पाखरे येती), श्रीमती र. ज. चौव्हाण (बिटको), गर्ल्स हायस्कूल (पराधीन आहे जगाती), पुरु षोत्तम इंग्लिश स्कूल (मला मोठं व्हायचंय), आरंभ महाविद्यालय (रणरागिणीचे बलिदान), महिला महाविद्यालय (तिचं अस्तित्व) या एकांकिका सादर करण्यात आल्या.
महाराष्टला अनेक कलावंत मिळाले : अभिजित खांडकेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:57 AM