नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी अग्रेसर राहू शकते. त्यामुळे दोन्हीही बाबतीत देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टकडे येण्याची शक्यता दिल्लीतील लोकमतचे संपादक सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या १७८ व्या वार्षिक समारंभाच्या निमित्ताने स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. महाराष्टÑ टाइम्सचे नवी दिल्लीतील वरिष्ठ सहायक संपादक सुनील चावके यांना भटेवरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भटेवरा पुढे म्हणाले, देशात २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत, कोण सत्तेवर येईल याबाबत नेहमीच विचारणा केली जाते. परंतु कोणत्याही घटनेने इव्हेंट साजरा करणे एवढे एकमेव काम या सरकारने केले आहे. जेव्हा कधी त्यांना त्यांच्या कामगिरीबाबत विचारणा केली जाते त्यावेळी कॉँग्रेसकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे किमान शंभर खासदार कमी होतील, असा दावा करून भटेवरा यांनी त्यामागच्या कारणांची मिमांसा केली. आजवर झालेल्या लोकसभेच्या आठ पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. येत्या निवडणुकीतही जागा कमी झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघा डीतील घटक पक्ष पंतप्रधानपदासाठी पुन्हा मोदी यांच्यासाठी पुढे येणार नाहीत. अशा वेळी मोदी यांच्या तोडीस तोड नेता म्हणून नितीन गडकरी यांच्या नावावर सहमती होऊ शकेल आणि सर्वच विरोधीपक्ष एकजुटीने या निवडणुकीत उतरले व त्यांना यश लाभले तर राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याऐवजी शरद पवार यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळू शकेल असे भटेवरा यांनी सांगितले.या प्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, किशोर पाठक, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, भानुदास शौचे, निवड समितीचे योगेश खरे आदी उपस्थित होते. प्रारंभी जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले, तर संजय करंजकर यांनी परिचय करून दिला. निवड समितीतर्फे दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर अभिजीत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर बोºहाडे यांनी, तर आभार उदयकुमार मुंगी यांनी मानले.माध्यमांचे विभाजनसत्काराला उत्तर देताना सुनील चावके यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्या काळात पत्रकारिता केली त्यावेळी इंग्रजांचा त्यांच्यावर दबाव होता तसाच दबाव आजही माध्यमांवर टाकला जात असल्याचे सांगत, सत्ताधारी व विरोधीपक्ष अशा दोहोंमध्ये माध्यमांचे विभाजन झाले असल्याने जो तो आपल्यापरीने त्यातून अर्थ काढू लागल्याचे सांगितले. आगामी निवडणूक सत्ताधाºयांना जशी अवघड आहे तशीच विरोधकांनादेखील सोपी नसल्याचे ते म्हणाले. देशात कधी नव्हे इतकी भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून, वृत्तपत्रांवर अघोषित आणीबाणी लादून त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे झाल्यास देशाची घडीच विस्कटेल त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर व लोकमान्य टिळक यांनी अंगीकारलेले सत्य बोलण्याचे व लिहिण्याचे धाडस पत्रकारांनी दाखविले तरच देश वाचू शकेल, असे मतही सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले.
देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टलाच :सुरेश भटेवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:16 AM
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी अग्रेसर राहू शकते.
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकतेस्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरणविरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी