महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजवणारे हर्षवर्धन सदगीर यांना नाशिक महापालिकेने अगोदरच ब्रँड ॲम्बेसडर म्हणजे सदिच्छा दूत जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांना मदतीचे आश्वासन दिले असले तरी मध्यंतरी कोरोनाकाळामुळे पुढे काहीच घडले नव्हते. आता सदगीर हे शुक्रवारपासून (दि.२) पुणे येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या तयारीसाठी जाणार आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.१) महापालिकेच्या वतीने
स्थायी समिती सभापती गणेश गीते व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी गटनेते शाहू खैरे, नगरसेवक दिनकर पाटील,मुकेश शहाणे,राकेश दोंदे, प्रभाग सभापती रवींद्र धिवरे,नगरसेविका समीना मेमन,नगरसचिव राजू कुटे व अन्य नगरसेवक उपस्थिती होते.
यावेळी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना गीते यांनी व्यक्तिगत २१ हजार रुपये रोख, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविले. तसेच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हे ज्या ज्यावेळी खेळण्यासाठी जातील तेव्हा त्यांना मनपाच्या वतीने मानधन देण्यात येईल व त्यांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी सभापती गणेश गीते यांनी सांगितले.
===Photopath===
010421\293001nsk_32_01042021_13.jpg
===Caption===
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर याचा सत्कार करताना स्थायी समिती सभापती गणेश गिते. समवेत शाहु खैरे, दिनकर पाटील, मुकेश शहाणे