- संजय पाठकनाशिक- लोकसभा निवडणूकिसाठी नाशिकच्या जागेसंदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात आला असून शिंदे सेनेच्या वतीने उमेदवारा बदलण्याची चर्चा होत आहे त्या दृष्टीने जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचारण केले आहे. त्यानुसार ते ठाणे येथे रवाना झाले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज दुपारी होत असून त्यामुळे नाशिकच्या जागेचा फैसला आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे
नाशिकची जागा सध्या शिंदे असून खासदार हेमंत गोडसे हे उमेदवारीसाठी दावेदार आहेत मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ यांचे नाव पुढे करण्यात आले होते. भाजपाने ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते भाजपा कडून गोडसे यांच्या नावाला प्रतिकूलता व्यक्त करण्यात आली असून पर्याय उमेदवाराचा देखील शोध घेतला जात होता त्या दृष्टिकोनातून शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव देखील चर्चेत होते आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय बोरस्ते यांना ठाणे येथे बोलवले असून ते रवाना झाले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दुपारी बैठक होणार आहे त्यामुळे आता भुजबळ की बोरस्ते असे पर्याय उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. अजय बोरस्ते हे मूळ भाजपाचे असून संघ परिवाराशी देखील संबंध आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या विषयी अनुकूलता व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.