नाशिक : आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास होणारी दिरंगाई आणि दरमहा वेतनास होणारा विलंब या प्रमुख मागण्यांबरोबरच अन्य मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करून शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.आश्वासित प्रगती योजनेचा लाभ (वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी) देण्यास दिरंगाई होत असल्याने याकडे लक्ष देण्यात यावे, परिभाषित अंशदान योजनेच्या कपात रक्कम, दरमहा वेतनास होणारा विलंब, जुनी पेन्शन योजना लागू करणे, २३/१०/२०१७चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करणे, पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक पदोन्नतीची कार्यवाही करणे, बारावी विज्ञान उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषयातील पदवीचे शिक्षण घेण्याची मुभा व परवानगी मिळावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र या प्रस्तावांचे काय होते आणि ते गहाळ कसे होतात हा संशोधनाचा विषय आहे. शासकीय सेवेत असलेल्या शिक्षक कर्मचाºयांच्या डीसीपीएस योजेनेंतर्गत दरमहा वेतनातून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब लेखा विभागाला अद्यापही देता आलेला नाही. शासनस्तरावर दरमहा महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याप्रसंगी शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्टÑ सरचिटणीस बबन चव्हाण, विलास हडस, धनंजय सरक, प्रशांत खराडे, संदीप सरोदे, साहेबराव कसबे आदी उपस्थित होते.
महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेचे घंटानाद आंदोलन जिल्हा परिषद : आश्वासित प्रगती योजनेची प्रमुख मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:24 AM
नाशिक : आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास होणारी दिरंगाई आणि दरमहा वेतनास होणारा विलंब या प्रमुख मागण्यांबरोबरच अन्य मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देपदोन्नतीची कार्यवाही करणे पदवीचे शिक्षण घेण्याची मुभा