शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
3
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
4
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
6
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
7
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
8
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
9
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
10
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
11
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
12
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
13
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
14
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
15
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
16
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
17
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
18
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
19
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!

लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:58 IST

महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयीचा लेख...

महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शु. अक्षयतृतीया सन ११०५ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी, जि. विजापूर येथे झाला. श्रावण शुद्ध ५ (नागपंचमी) सन ११६७ मध्ये कूडल संगम, जिल्हा विजापूर येथे कृष्णा-मलप्रभा नद्यांच्या संगमात त्यांनी संजीवन जलसमाधी घेतली. (जन्मतारीख, वर्ष, जलसमाधी काल याबाबत मतभेद आहेत.)बसवेश्वरांनी शेती, वाणिज्य, सामूहिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, छोट्या उद्योगधंद्यात वाढ इत्यादी अनेक योजना आखल्या व त्या राबविल्या. शेतामध्ये विहिरी, तलाव, तळी-बंधारे यांच्या सोयी केल्या. सामूहिक श्रम आणि शिक्षणाची लोकांमध्ये आवड निर्माण केली. सामान्य आणि दलित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी (बाराव्या शतकात) गरिबी हटावसारख्या योजना आखल्या व यशस्वीरीत्या पार पाडल्या.महात्मा बसेश्वर मनाने, विचाराने आणि कृतीने संत (शिवशरण) होते. ध्यान, चिंतन आणि मनन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या दृष्टीने धर्मशील पुरुष राज्यकर्ता असावा. धर्म म्हणजे ईश्वरी गुण, धर्मशील म्हणजे ईश्वरी गुण धारण करणारा ईश्वर हा विश्वाचा शासनकर्ता आहे. राजा हा राष्ट्राचा शासनकर्ता असतो. राजा किंवा राज्यकर्ता ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून विश्वाच्या त्या भागावर राज्य करीत असतो. म्हणून जे जे ईश्वराचे गुण ते ते गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे लागतात. बसेश्वरांच्या दृष्टीने राजसत्ता हे साधन आहे आणि राष्ट्राचे अंतिम हित हे साध्य आहे. राष्ट्र म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची सगुण-साकार मूर्ती होय. आपल्या उन्नतीसाठी व्यक्तींनी, समाजांनी आणि राज्यकर्त्यांनी त्यांची पूजा करायला हवी. उन्नतीसाठी झटावयास हवे, असे त्यांना वाटे.महात्मा बसवेश्वर हे अवतारी पुरुष होते. उपजतच त्यांच्या ठिकाणी ईश्वरी गुण होते. त्यांचे हृदय शिवशरणांचे, संतांचे होते. ते धर्मशील होते. प्रापंचिक असूनही विरक्त होते. ते विज्जळ राजाचे प्रधानमंत्री होते. आदर्श शासनकर्ते होते. बालपणापासून अनेक आदर्शांची स्वप्ने ते उराशी बाळगून होते. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. त्या वयापर्यंत त्यांना सगुण साकार ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला होता. राज्यकारभार स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनसूत्र होते.अनिल लक्ष्मण कोठुळे-उत्तर महाराष्ट्र प्रमुख :अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना

टॅग्स :NashikनाशिकPersonalityव्यक्तिमत्व