‘सक्षम’ संस्थेचा उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून गौरव करताना रमेश पतंगे. समवेत व्यासपीठावर डावीकडून लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, आमदार सीमा हिरे, मंगला जोशी, निशिगंधा मोगल आदी.
नाशिक : संविधान समजून घेणे इतके सोपे नाही जितक ी त्याविषयी चर्चा केली जाते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा आहे, असा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनाच मुळात संविधान समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी असा अपप्रचार करणे हा मोठा विनोदाचा व मूर्खपणाचा भाग ठरू शकतो, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.प्रसाद सोशल ग्रुप व राष्टÑीय विचार प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘आम्ही व आमचे संविधान’ या विषयावर पतंगे यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपाचे चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर दशरथ पाटील, सुहास फरांदे, निशिगंधा मोगल, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पतंगे म्हणाले, संविधान म्हणजे काय हे जाणून घेणे आणि समजून घेणे हे सोपे नाही. संविधानाचा विषय अत्यंत कठीण असून भारतीय संविधानाला मोठा इतिहास आहे. संविधानाची ताकद ही अमेरिकेला समजली. अमेरिकेला बलाढ्य हे त्यांच्या केवळ सात कलमांच्या संविधानाने केले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या तुलनेत भारतीय संविधान हे अत्यंत व्यापक व सार्वभौमत्वाचा स्वीकार करणारे आहे, असे पतंगे म्हणाले. दरम्यान, ‘सक्षम’ या संघटनेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत देवदत्त जोशी यांनी के ले.घटना समितीत सर्व जाती-धर्माचे सदस्य१९४६ साली भारतीय राज्यघटना समिती गठित करण्यात आली. ही समिती कॉँग्रेस पक्षाची नव्हती तर देशाच्या घटनेसाठी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या समितीमध्ये सर्व जाती-धर्माचे सदस्य होते, असेही ते म्हणाले. देशाची घटना तयार होत असताना अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कांचे संरक्षणाच्या हेतूने मला घटना समितीमध्ये स्थान हवे होते; मात्र मसुदा समितीचे अध्यक्ष केल्याने धक्का बसल्याची खंत त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती, असेही यावेळी पतंगे यांनी बोलताना अधोरेखित केले.