मुंबई : अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षातील झगडे यांची ही चौथी बदली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असताना झगडे यांनी भ्रष्ट अधिकारी आणि औषधविक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती. त्यामुळे तिथून त्यांची बदली करून त्यांना परिवहन खात्यात आयुक्त म्हणून पाठविण्यात आले. मात्र, अवैध वाहतुकीविरोधात त्यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांची परिहनमधून पुणे येथे ‘पीएमआरडी’ला बदली करण्यात आली. तिथे ते अवघे सव्वा वर्ष होते. तिथून त्यांना नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून पाठविण्यात आले. नाशिकला ते नऊ महिनेच होते. ३१ मे रोजी झगडे सेवानिवृत्त होत आहेत.माने आज पदभार स्वीकारणारनूतन आयुक्त राजाराम माने गुरुवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी बीडला मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांची पुण्यात महाराष्टÑ ऊर्जा अभिकरण महासंचालक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली.
महेश झगडे यांची चौथ्यांदा बदली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:57 AM