लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने वावी येथील नवनिर्वाचित सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना नवनाथ काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. विकासकामे करुन गावाची ओळख आगळेवेगळे व आदर्श गाव म्हणून निर्माण करावी, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.
विठ्ठलदास आसावा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता काटे, डॉ. कमलाकर कपोते, निरज भट्टड, संतोष पलोड, आनंदा कांदळकर यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, ग्रामपंचायत सदस्य विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, रामराव ताजणे, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, दीपाली खाटेकर, साधना घेगडमल, आश्विनी वेलजाळी यांचा माहेश्वरी पगडी, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गावाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन विजय काटे यांनी केले. यावेळी विजय सोमाणी, शामसुंदर मालपाणी, द्वारकानाथ जाजू, कैलास जाजू, प्रदीप मंडलिक, संदीप भोसले, विनायक घेगडमल, आशिष माळवे, गणेश वेलजाळी, विजयकुमार जाजू, अशोक मालपाणी, ओंकार मालपाणी, संतोष जोशी, मदनलाल कर्नावट, ओंकार धूत, राजेंद्र खांबेकर, दत्तात्रय नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जयेश मालपाणी यांनी सूत्रसंचालन केले तर माहेश्वरी महिला मंडळाच्या सचिव मंजुश्री मालपाणी यांनी आभार मानले. (वा.प्र)
चौकट-
जाजू, सुपेकर यांचा सत्कार
नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने दिला जाणारा ‘महेश कर्मवारी पुरस्कार’ द्वारकानाथ जाजू यांना मिळाल्याबद्दल तसेच ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ मिळाल्याबद्दल रवींद्र सुपेकर यांचा माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
फोटो - ११ वावी माहेश्वरी
वावी येथे माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, विजय काटे, रामनाथ कर्पे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व माहेश्वरी युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
110321\11nsk_11_11032021_13.jpg
===Caption===
फोटो - ११ वावी माहेश्वरी वावी येथे माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, विजय काटे, रामनाथ कर्पे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व माहेश्वरी युवक मंडळाचे कार्यकर्ते.