सातपूर : येथील महिंद्र अॅन्ड महिंद्र कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतन वाढीच्या करारात सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या बदल्यात कामगारांना दरमहा सरासरी १२ हजार २५० रु पयांची वाढ मिळणार आहे. वेतन वाढीच्या करारावर स्वाक्षºया झाल्यानंतर कामगारांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांच्या दालनात वेतन वाढीच्या करारावर अंतिम स्वाक्षºया करण्यात आल्या. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, चिटणीस परशुराम कानकेकर, सहचिटणीस लॉरेन्स भंडारे, कमिटी मेंबर सुनील औसरकर, भुवनेश्वर पोई तर औद्योगिक संबंध विभागाचे विजय नायर, महाव्यवस्थापक चंद्रकांत धांडे, सतीश गोगटे, संदीप कुलकर्णी, स्वाती बेंद्रे, जतेंद्र कामटीकर, दत्तप्रसाद घाटे आदींनी स्वाक्षºया केल्या. या करारानुसार सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या मोबदल्यात ग्रेडनुसार कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त १५ हजार २२२ म्हणजेच सरासरी १२ हजार २५० रु पयांची वेतन वाढ मिळणार आहे. मयत कामगारांच्या वारसांना कंपनी सेवेत घेण्याची वयाची अट शिथिल करण्यात आली. चालू वर्षी ४ एप्रिल रोजी गत वेतन वाढीच्या कराराची मुदत संपल्यानंतर दरम्यानच्या काळात नवीन वेतन वाढीच्या कराराची बोलणी व्यवस्थापनाबरोबर सुरू झाली. सुरु वातीपासून उभयतांमध्ये सकारात्मक बोलणी झाल्याने वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर कामगारांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
महिंद्रातील कामगारांना सरासरी बारा हजारांची वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:29 AM