गणगौर हा सण राजस्थानमध्ये उत्साहात साजरा केला जातो. एका कथेनुसार गण म्हणजे भगवान शंकर व गौरी म्हणजे देवी पार्वती. म्हणून या उत्सवात शंकर व पार्वतीची पूजा केली जाते. अविवाहित मुली चांगला पती मिळावा यासाठी गौरीची पूजा करतात तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून डोक्यावर कळस घेऊन शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत संगीता काबरा, सुजाता काबरा, ज्योती काबरा, सरिता काबरा, श्रद्धा चांडक, रश्मी करवा, मीनल काबरा, नंदा मुंदडा ,कुसुम कलंत्री, मीना अट्टल, विष्णूकांता अट्टल, मीनल काबरा, पौर्णिमा करवा, अनुराधा काबरा, आराधना मुंदडा, नीता मुंदडा, स्मिता सोनी, कीर्ती सोनी, चंदा काबरा, शैला कलंत्री, अलका जाजू, पीनल वर्मा यांच्यासह माहेश्वरी समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
माहेश्वरी महिला मंडळातर्फे गणगौर सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 6:20 PM