पिळकोस : परिसरात गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. पावसाने परिसरातील मका पिक भुईसपाट झाले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. शेतीचे आर्थिक नुकसान झाल्याने पुढील आर्थिक गणितही बिघडले आहे .शासनाने शेतक?्यांची पिक विमे मंजूर करून शेतक?्यानं विमा लाभ द्यावा अशी मागणी जोर धरत आहे . आमदार नितीन पवार यांनी पिळकोस ,विसापूर ,बिजोरे ,गांगवन ,चाचेर यांसह परिसरातील गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली .तसेच संबंधित विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तसेच शासनाकडे अहवाल पाठवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी शेतकर्यांना दिले . परिसरत दहा दिवसापासून पावसाने कहर केल्याने शेतकरी हैरान झाले असून काहीश्या प्रमाणात शेतीतून पाणी वाहत आहे. परिसरातील शेतीचे पंचनामे करून शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी आमदार पवार यांच्याकडे केली .यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,उपाध्यक्ष दादाजी जाधव ,भाऊसाहेब जाधव ,प्रवीण जाधव ,विलास रौंदळ, राजेंद्र भामरे ,दत्तू वाघ , अशोक जाधव शेतकरी उपस्थित होते .
पिळकोस परिसरात मका पिक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 3:38 PM