दोन दिवसांपासून आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मुल्हेर, हरणबारी,मोहळागी ,माळीवाडा ,जैतापूर ,अंबापूर ,जाड ,अलियाबाद परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला .या वादळी पावसामुळे मक्याचे तीन महिन्यांचे उभे पिक भुईसपाट होऊन पिकांचे नुकसान झाले. मे महिन्यात झालेल्या निसर्ग चक्र ीवादळाच्या पावसामुळे या भागात हजारो रु पये खर्च करून मक्याचा पेरा केला होता. मात्र पिक जोमात असतांना दोन दिवसांच्या वादळी पावसामुळे मका भुईसपाट झाला आहे .दरम्यान,आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्र वारी अंबापूर ,मुल्हेर , हरणबारी ,माळीवाडा ,अजंदे आदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली .यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार ,विस्तार अधिकारी नितीन देशमुख आदी उपस्थित होते .आमदार बोरसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे .पंचनामे झाल्यास भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले .दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे ,पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही भरपाईसाठी निवेदन सादर केले आहे .
बागलाण तालुक्यात पावसाने मका पीक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 4:48 PM