पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मका, सोयबीनसह छाटणी केलेल्या द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.शिवाय कारसुळ शिवारात शेतकरी वसंत एकनाथ जाधव, यांचा उभा मका जोरदार पावसाने पूर्णपणे झोडपून टाकत जवळपास २ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतक?्यांच्या मका, सोयबीन, छाटणी केलेल्या द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ह्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे तरी तहसिलदार दिपक पाटील व तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील यांनी याकडे लक्ष देत नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी कारसुळ येथील नुकसान ग्रस्त शेतक?्यांकडून होत आहे. (२५पिंपळगाव २)