मानोरी : लष्करी अळी आणि अवकाळी पावसाने मानोरी बुद्रुक परिसरात शेतकऱ्यांचे मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा कोरोनाची भर पडली आहे. पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आल्याने मक्याची मागणीही घटली परिणामी भाव पडल्याने मका उत्पादक शेतकरी देखील हवालिदल झाला आहे. मक्याला चांगले दर मिळतील या अपेक्षेने सोंगुण ठेवलेली मका तब्बल चार ते पाच महिने शेतकऱ्यांच्या खळ्यावर साठवून ठेवली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मक्याला १८०० रुपयांपर्यंत भाव गेल्याने शेतकºयांना भाव वाढीची आशा लागून होती. दिवसेंदिवस भाव कमी होत गेले आणि कोरोनाने तर चांगलीच घसरण झाली. अद्यापही शेतकºयांच्या खळ्यात काढलेले मक्याचे गंज तसेच पडून आहे तर अवकाळीच्या फटक्याने मक्याचेही नुकसान झाले आहे.
मका उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:38 PM