खरीप हंगाम २०२१-२२ साठी केंद्र शासनाने मक्यासाठी १ हजार ८७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यावर्षी नोंदणी प्रक्रिया वेळेवर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी त्रास कमी होणार आहे. वीस दिवस नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ खरीप हंगामातील मका पिकाची नोंद असलेला सातबारा खाते उतारा, लागवडीखालील क्षेत्र, शेतकऱ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, आयएफसी कोड असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहे. पीक नोंदणी. यासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये उभे असलेल्या मका पिकाची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया दि. ३० सप्टेंबर सुरू राहणार असून मका उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे नोंदणीसाठी त्वरित कार्यालयात घेऊन यावे, असे आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
हमीभावाने मका नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:17 AM