मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.काही शेतकरी अद्यापही जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरण्या करणार नसल्याचे बोलले जात आहे.तर काही ठिकाणी रविवारी मका टाकण्यासाठी शेतात गेले असता शेतकरी वर्ग पुरेशी जमिनीत ओल नसल्याने माघारी फिरल्याचे दिसून आले होते.सुमारे वर्षभरापासून शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नव्हते आता पाऊस वेळेवर पडता झाल्याने शेती कामांना सुरु वात झाली आहे.शनिवारी दुपारी तीन ते चार तास पावसाची चांगल्या प्रकारे रिपरिप सुरू असताना या पावसात शेतकरी वर्गाने मका पेरणी करण्यासाठी धावपळ केली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी देखील दांडी मारल्याने मका , सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकरी वर्गात पुन्हा धास्ती उभी राहिली असून, मोरांची संख्या देखील मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात टाकलेली मका मोर खात असल्याने दुसरी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे.गत वर्षी पेरण्या झाल्यानंतर पावसाने पूर्ण पणे ओढ दिल्याने मका आणि सोयाबीन ची पिके पाण्याविना करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फेडता न आल्याने परिणामी दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढावली होती.यंदा उशिरा का होईना पाऊस पडता झाल्याने शेतकर्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व पावसाने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर मशागत करणे शेतकरी वर्गाला सोपे झाले होते.पारंपरिक पद्धतीने यंदाही शेतकरी बैल जोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. पाऊस जास्त झाला असला तर ओल मात्र कमी असल्याने शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैल जोडी चा वापर शेतकरी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना घरची औत आहे अशा शेतकऱ्यांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे सºया घेऊन मका, बाजरी, सोयाबीन पेरणीला सुरु वात केली. तर काही शेतकºयांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात मका टाकण्यासाठी सरी पाडण्यासाठी गेले असता बळी जमिनीत घातला असता तर पूर्ण कोरडी माती वर येत असल्याने मानोरीत काही शेतकर्यांनी पेरणी करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले असून ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता दमदार आणि भिज पावसाची आवश्यक आहे.विहिरींना पावसाचा अद्याप फायदा नाहीखडकीमाळ येथे सुमारे महिना भरापासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकर ला मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ३० जून नंतर टँकर बंद होणार असल्याचे बोलले जात असून, ग्रामीण भागात अद्याप विहिरींना पाणी उतरेल इतका मुसळधार पाऊस झालेला नाही आणि खडकीमाळ येथील बहुतांश शेतकरी कुटुंबही शेतशिवारात राहत असल्याने सध्या पडलेल्या दोन पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले असून, विहिरींना या पावसाचा अद्याप तरी फायदा होणार नसल्याचे खडकीमाळ येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
मका, सोयाबीन पेरणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 6:34 PM
येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.
ठळक मुद्देपेरण्या झाल्या; पुढील भवितव्य पावसाच्या हाती