वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यातील वावीहर्ष येथे बस व टाटा सुमो यांचा अपघात थोडक्यात वाचला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली.त्र्यंबकेश्वरहून इगतपुरी येथे जाणाऱ्या बस क्र . एमएच १२ इएफ ६८१३ मध्ये साधारणत: ५० प्रवासी होते. ही बस त्र्यंबकेश्वरहून देवगाव मार्गे इगतपुरीला निघाली होती. रक्षाबंधन सणामुळे बस प्रवाशांनी भरली होती,अशातच बस तालुक्यातील वावीहर्ष येथे आली असताना समोरून येणाºया टाटा सुमो क्र . एमएच १५ सीडी ९१८१ च्या चालकास अंदाज न आल्याने ते बसवर धडकणार तेवढ्यात बसचालकाने गाडीचा अंदाज घेत गाडी व प्रवासी यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. अचानक ब्रेक दाबल्याने व रस्ता ओला असल्याने गाडीने रस्ता सोडला व ती रस्त्याच्या कडेला चारीत अडकली, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. काही प्रवाशांना मुका मार लागला आहे.या घटनेची कल्पना श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी तत्काळ संबंधित अधिकारी पोलीस प्रशासन यांना दिली; परंतु अधिकारी यांनी या विषयाचे गांभीर्य न बाळगता प्रवाशांना ताटकळत ठेवले. वावीहर्षचे सरपंच बाबूराव बुरंगे यांनी सर्व प्रवाशांना चहा व नाश्ता दिला. सर्वांना धीर देत मदत केली.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 7:01 PM