नीलेश विकमसे : ‘आयसीएआय’च्या वतीने जीएसटी कार्यशाळा उत्साहात
नाशिक : आर्थिक क्षेत्रात होणारे बदल तसेच जीएसटी, चलन निश्चलनीकरण, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे सीए अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात येणार असून, येणार असल्याची माहिती आयसीएआयचे अध्यक्ष नीलेश विकमसे यांनी दिली.दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाउंटस आॅफ इंडिया नाशिक शाखेच्या वतीने अशोकामार्ग येथील आयसीएआय भवन येथे वस्तू व सेवा कर कार्यशाळा नीलेश विकमसे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. वित्तीय क्षेत्रातील बदलांबरोबरच ‘मेक इन इंडिया’ तसेच बदलते परराष्टÑ धोरण याचा विचार करून हा बदल करण्यात येणार आहे.यापूर्वी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीपीटी कोर्समध्ये प्रवेश घेऊन बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होता येत होते. मात्र आता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आयटीएआयमध्ये फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे सांगून विकमसे यांनी चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी फाउंडेशन परीक्षेस पात्र ठरतात, इंटरमिडीएट या परीक्षेला पात्र ठरण्याकरिता फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होण्याबरोबरच बारावीची परीक्षादेखील उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नरेश शेठ यांनी कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर आयसीएआयच्या राष्टÑीय कार्यकारिणीचे सदस्य प्रफुल्ल छाजेड, सचिव रोहन आंधळे, खजिनदार हर्षल सुराणा, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे, रवि राठी, मिलन लुणावर, रणधीर गुजराथी, रेखा पटवर्धन उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष विकास हासे यांनी केले. तसेच इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी मनीषा सोनवणे यांना विकमसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. लेखापाल हे सरकार-व्यापाºयांमधील दुवादेशाच्या करप्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी लागू केला आहे. सद्यस्थितीत व्यापारी आणि सनदी लेखापाल यांना वस्तू सेवा कराच्या अंमलबजावणीत खूप अडचणी येत असल्या तरी जीएसटीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी लेखापाल हे सरकार आणि व्यापाºयांमधील दुवा असल्याचे मत आयसीएआयचे अध्यक्ष नीलेश विकमसे यांनी व्यक्त केले.