त्र्यंबकेश्वर : सतत पडणा-या पावसाने त्र्यंबक तालुक्यात दाणादाण उडवून दिली असुन अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त असून मदत कार्य सुरु झाले आहे.तालुक्यात धुवांधार पाऊस पडत असुन आतापर्यंत १५०० मि. मि. पाऊस कोसळला आहे. वाघेरा ते हरसुल घाट रस्त्यावर दरड कोसळल्या असुन वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम अर्धा रस्ता मोकळा करुन रस्त्याची एक बाजु चालु केली असुन तेवढ्या भागापुरती वाहतुक सुरळीत चालु आहे. दुसरी बाजू मोकळी करण्याचे काम उशीरापर्यंत चालू होते.वावीहर्ष ते देवगाव रस्त्यावरुन पाणी वाहत असुन या रस्त्यापुरता दोन गावांचा संपर्क तुटला असला तरी दुसरे पर्यायी मार्ग चालु आहेत. देवडोंगरा ते आडगावदेवळा येथील शेतकरी मधुकर निंबारे यांच्या रेड्यांचा शॉक लागून मृत्यु झाला. तर गोपाळ खोसकर यांचा रेडा नाल्याच्या पुरात वाहुन गेला. दरम्यान तालुक्यातील पाच ते सहा गावांच्या १० ते १५ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असल्याचे समजते. घरांचीही पडझड झाली आहे.इसमाचा मृतदेह...आडगावदेवळा येथील रहिवासी रोहिदास कांशीराम ढोले हे मागील आठ दिवसांपासून परागंदेत होते. सोमवारी (दि.१९) कड्याच्या खाली त्यांचा मृतदेह सापडला. याबाबतची खबर संबंधित गावच्या तलाठ्यांनी दिली आहे. पुढील तपास हरसुल पोलीस करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 9:06 PM
त्र्यंबकेश्वर : सतत पडणा-या पावसाने त्र्यंबक तालुक्यात दाणादाण उडवून दिली असुन अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त असून मदत ...
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यात घर, शेतीचे नुकसान : दोन रेडे मृत !