सिडको : सिडको येथे वास्तव्यास असलेले मेजर जयेश वर्मा यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्याविरोधात लढा दिल्याबद्दल त्यांच्या शौर्याची दखल घेण्यात आली.सिडको परिसरातील प्रताप विहार या भागात असलेल्या आर्मी जवानांच्या कॉलनीत मेजर वर्मा राहतात. सप्टेंबर २०१७ मध्ये मेजर वर्मा हे त्यांचे टीमसोबत जम्मू-काश्मीर येथे पेट्रोलिंग करीत असताना अचानक आतंकवाद्यांच्या टोळीने गोळीबार सुरू केला. यावेळी मेजर वर्मा यांनी कोणताही विचार न करता अत्यंत साहसाने दोन आंतकवाद्यांना कंठस्नान घातले.अन्य एक आतंकवादी घरात लपून बसलेला असताना मेजर वर्मा यांनी त्यांचे युद्ध कौशल्याचा वापर करून त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून तिसऱ्या अतिरेक्यांशी लढण्यास सुरु वात केली. या आतंकवादींसोबत लढताना ते गंभीर जखमी झाले, पण त्यांनी सदर ठिकाणावरून स्वत:ला बाहेर घेऊन जाण्यास नकार दिला व तिसऱ्या आतंकवादीसोबत लढणे सुरू ठेवले. काही वेळाने तिसरा आतंकवादीसुद्धा निष्क्र य झाला. त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य पार पाडले.या शौर्याची दखल घेऊन त्यांना सैन्य दलातील मानाचे शौर्यचक्र भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आले आहे. वर्मा हे सन २०११ साली मेजर आर्मीत दाखल झाले आहेत.
मेजर वर्मा शौर्य पदकाने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:48 AM