वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : रथचक्र कट्टाइंदिरानगर : विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठ नागरिकांचा एक गठ्ठा मतदान याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निकालाविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांनी हुकूमशाहीकडे वाटचाल करू नये, असे सांगितले.पक्षाला बहुमत म्हणजे हुकूमशाही असे वाटू लागले आहे तसेच सत्ताधाऱ्यांसमोर विरोधीपक्षही महत्त्वाचा असतो यावरच एका ज्येष्ठाने विरोधीपक्ष नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याने मत मांडले त्यावर एकाने लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच एकाने सरकार हे फक्त गोडबोले असून, त्यांच्याकडून साधे-साधे प्रश्न सुटत नसल्याचे मत मांडले. तसेच एकाने राजकीय पक्ष म्हणजे सफेद पोषाखातील गुंड असल्याचे मत मांडले. त्यावर एकाने शहरातील काही राजकीय पक्षातील लोकांचे नाव घेत संताप व्यक्त केला. तसेच एकाने जिल्हा शेतीप्रधान असूनदेखील शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता नव्याने स्थापन होणाºया सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असे मत व्यक्त केले. तसेच एकाने राज्यासह जिल्ह्यातील जातीपातीचे व घराणेशाहीचे राजकारण संपले पाहिजे तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचे मत मांडत आमदारांना मिळणारे मानधन कमी करायले हवे, असेपण ते जनतेचा पैसा खातात असे मत मांडले. शेवटी सगळ्या ज्येष्ठांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत एकमताने व्यक्त केले.(या चर्चेत अरविंद पाटील, जयवंत मोरे, रमेश नागरे, सदाशिव उगले, बाबूराव पाटील, रंगनाथ राऊत, तुकाराम मोरे आदींनी सहभाग घेतला होता.)सरकार कोणतेही आले तरी ते हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले. भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी अचानक नोटबंदी करत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जनतेने आपले बहुमूल्य मत देत सरकार स्थापन केले, मात्र सरकारने काही निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध घेतल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.
बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:05 AM