नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने भगूरसह शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. कोरोनामुळे गर्दी जमविण्यास मनाई असल्याने अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हेाते.
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५५व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर जन्मभूमी येथे सावरकर स्मारकात सकाळी पुरातत्त्व विभाग यांच्यातर्फे शासकीय कार्यक्रम तसेच बागेश्री वाद्यवृंद नाशिक यांच्यातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. शिवाजी चौक येथे रक्तदान शिबिर झाले, तर चित्रप्रदर्शनाद्वारे सावरकरांना अभिवादन करण्यात आले.
सावरकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात सहायक संचालक पुरातत्व विभाग नाशिकच्या आरती आळे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी जतन सहायक सोमनाथ बोराडे, बाळकृष्ण बालपांडे, स्मारक व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, मंगेश मरकड, संपत देशमुख, संभाजी देशमुख आदी उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विलास कुलकर्णी, भगूर शहर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शेखर कस्तुरे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नीलेश हासे, अनाजी कापसे आदींनी अभिवादन केले.
सकाळी ११ ते २ दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व नवजीवन ब्लड बँक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी घेण्यात आले. यावेळी रक्तदाते संध्या शिंदे, राजश्री कुवर, उमेश नहार, जितेंद्र रोहणकर, हेमंत कोटे, भगवान वाकचौरे, केतन सोनवणे, मधुकर आष्टीकर, सचिन कुवर, लक्ष्मण खैरनार, मनोज कलंत्री आदींसह एकूण २० जणांनी रक्तदान केले.
--इन्फो--
भगूर येथे अविश्वसनीय सावरकर ‘माझी दृष्टी’ भगूर ते अंदमान चित्रप्रदर्शन कलाशिक्षक योगेंद्र पाटील जळगाव (पाचोरा) यांनी माहेश्वरी बालाजी हॉल या ठिकाणी आयोजित केले होते. यावेळी स्वानंद बोरकर, डॉ. जयंतराव पाटील, श्रीमती सुमित्रा पाटील, राजीव पाटील, ए. बी. पाटील, सुनील पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य संजय नेने आदी उपस्थित होते.
===Photopath===
260221\26nsk_26_26022021_13.jpg~260221\26nsk_29_26022021_13.jpg
===Caption===
पुरातत्व विभागाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक संचालक आरती आळे, समवेत सोमनाथ बोराडे, बाळकृष्ण बालपांडे, मनोज कुवर, भूषण कापसे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, मंगेश मरकड, संपत देशमुख, संभाजी देशमुख आदि.~पुरातत्व विभागाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक संचालक आरती आळे, समवेत सोमनाथ बोराडे, बाळकृष्ण बालपांडे, मनोज कुवर, भूषण कापसे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, मंगेश मरकड, संपत देशमुख, संभाजी देशमुख आदि.