नाशिक : जागतिक तपमानवृद्धीमुळे ध्रुव प्रदेशांमधील बर्फ झपाट्याने वितळत असून, सागरी जल पातळीमध्ये वाढ होत आहे. तसेच पृथ्वीचे तपमानही शतकभरात वाढले असून, वारेही प्रचंड वेगाने वाहू लागले आहेत. या वाऱ्यांच्या वेगामधून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलाचा पूरक फायदा साधावा, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ एम. सी. देव यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त आर्किटेक्ट््स आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने वैराज कलादालनामध्ये ‘वातावरण बदल व स्थापत्य अभियांत्रिकी’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देव प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. देव यांनी पुढे बोलताना सांगितले की, वातावरणातील खालचा स्तर अति उष्ण, वरचा स्तर थंड अशी टोकाची व्यस्तता दिसून येत असल्याचे त्यांनी दृकश्राव्य यंत्राच्या माध्यमातून सादर केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काळे, प्रवीणचंद्र गायकवाड उपस्थित होते.दरम्यान, अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणारा क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अमित छावसरिया याला डी. एस. शिरोडे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा पुरस्कार दरवर्षी संस्थेच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येतो. (प्रतिनिधी)पवन ऊर्जेची गरज४मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी, महापूर अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. भारताचे तपमान वाढत आहे. जलदरीत्या बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक बेटे पाण्याखाली जाणार आहेत. समुद्रकिनारी पवनचक्क्यांची उभारणी करून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेगाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करण्याची संधी साधण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वातावरण बदलाचा पूरकफायदा करून घ्यावा
By admin | Published: September 07, 2015 10:38 PM