शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे गरजेचे,ग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:35 PM

विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यप्रगती व पुढील दिशाह्ण या संकल्पनेवर आयोजित विभागीय परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देदुर्बल घटकांच्या विकासाठी प्रयत्न होणे आवश्यकग्रामविकास राज्यमंत्री दादाभूसे यांचे प्रतिपादन73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विभागीय परिषदेत

नाशिक :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यप्रगती व पुढील दिशाह्ण या संकल्पनेवर आयोजित विभागीय परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त झगडे, नाशिक जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, अहमदनगर जि.प अध्यक्षा शालीनी विखे-पाटील, महापौर रंजना भानसी, विद्यापीठाचे कुलगुरु ई.वायुनंदन, मनपा आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, डी. गंगाधरन, पोलीस अधीक्षक संजय दराडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे, आदी उपस्थित होते. भुसे म्हणाले,गेल्या 25 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीअधिक प्रगल्भ झाली आहे. यानिमित्ताने पंचायतराज व्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला गेल्यास काळानुरुप बदल घडवून आणता येतील. वसंतराव नाईक समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. घटन दुरुस्तीनुसार शासनाकडील काही विषय स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीतकरण्यात आले आहेत.समाजातील समस्या दूर करण्या साठी आणि माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा हक्क देण्यासाठी घटनेच्या चौकटीत राहून उपाय शोधण्यात यावे. सकारात्मक दृष्टीकोनातून ग्रामपातळीवरील प्रश्न सोडवावे. भारताला महासत्ता बनविण्याच्या भावनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज व्हावे आणि जलयुक्त अभियान, स्वच्छ भारत आदी योजनांचे रुपांतरलोकचळवळीत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंचायतराज व्यवस्थेतील कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी लोकप्रतिनिधींनाप्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यात एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुतोवाच केले आहे. परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतुन निघणारे सारांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर विभागीय आयुक्त महेश झगडे म्हणाले, लोकांच्या आशा-आकांक्षा पुर्ण करण्यासाठी 73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेऊन पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे. मानवी जीवनात विकासाचे अनेक टप्पे आहेत. त्यातुन पुढे जात मानवाने प्रगती साधाली आहे. गेल्या 200 वर्षात प्रगतीचा वेग वाढून 54 टक्के जनता शहरी भागात रहात आहे. पुढील काही वर्षातहे प्रमाण 75 टक्क्यापर्यंत पोहोचेल. ग्रामीण भागातून नागरिक शहरात का जातात, त्यांनाआवश्यक सुविधा देण्यासाठी तरतूद केली जाते का याचा विचार परिषदेच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ई वायुनंदन यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मुलभूत सुविधा देण्यासाठीआणि एकंदरीत विकासासाठी शासनाने अत्यंत विचारपूर्वक घटनादुरुस्ती केल्याचे नमूद केले.

टॅग्स :ministerमंत्रीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका