नाशिक : भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोककला व कलावंतांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांविषयी लोकरंजनातून लोकजागृती करण्याचे काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर भारतीय लोककला व सांस्कृतिक चळवळीतून कलावंत प्रबोधन करत असले तरी त्यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न, त्यांच्या मागण्या शासनदरबारी प्रलंबित असून अशाप्रकारे लोकप्रबोधन व मनोरंजनाची धुरा वाहणाऱ्या लोककलावंत व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न होण्याची मागणी लोककलावंत संघटनेतर्फे करण्यात आली आहे. रविवार पेठेतील वडांगळीकर मंगल कार्यालयात जिल्हाभरातील बैठकीत लोककलावंतांच्या विविध समस्या व मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी लोककलावंतांचा राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव शासन स्तरावर आयोजित करण्यात यावा, वृद्ध कलावंतांच्या मानधनात पंधराशे रुपयांऐवजी 5 ते 10 हजार रुपयांर्पयत वाढ करावी, लोककलेची जोपासना करणाऱ्या युवा कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, शासनाकडून मिळणाऱ्या संगीत वाद्य खरेदीत तरतूद वाढवून मिळावी, तसेच लोककलावंतांना 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात यावा, सरकारने 10 टक्के घरांची योजना बंद केली आहे. ही योजना योजना पुन्हा सुरू करावी, त्याचप्रमाणे म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध होईल, अशी सदनिका उपलब्ध करून द्यावी, कलावंतांना एसटी, रेल्वे प्रवासात 75 टक्के सूट देण्यात यावी, आदी मागण्या सरकारसमोर मांडण्याचे ठराव यावेळी संमत करण्यात आले. तत्पूर्वी बैठकीला सांस्कृतिक कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आली. यावेळी बैठकीत सहभागी कलाकारांनी तमाशातील गीतांसह लोकगीते, गण, गौळण, फारसा, लालणी, वासुदेव, भोपी आदी लोककला प्रकारांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर जिल्हास्तरीय समितीने आगामी काळात लोककलावंत सांस्कृतिक शिबिराचे आयोजन करण्याचाही निर्धार केला आहे. यावेळी लावणीसम्राज्ञी नंदा पुणोकर, शाहीर मेघराज बाफना, दत्ता शिंदे, संपत खैरे, बाळासाहेब भगत, विश्वास कांबळे, मधुकर ङोंडे, श्रीकांत बेणी, बाळासाहेब भंवर, रेखा महाजन, पांडुरंग सांगळे आदी उपस्थित होते.
लोककला संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, कलावंतांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 2:00 PM
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोककला व कलावंतांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांविषयी लोकरंजनातून लोकजागृती करण्याचे काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर भारतीय लोककला व सांस्कृतिक चळवळीतून कलावंत प्रबोधन करत असले तरी त्यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न, त्यांच्या मागण्या शासनदरबारी प्रलंबित असून अशाप्रकारे लोकप्रबोधन व मनोरंजनाची धुरा वाहणाऱ्या लोककलावंत व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न होण्याची मागणी लोककलावंत संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देवृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावीयुवा लोक कलावंतांना मानधन मिळावेदहा लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळावेलोक कलावंतांच्या जिल्हास्तरीय बैठकीत ठराव