नांदूरवैद्य : सदैव संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा उद्धार होण्यास विलंब लागत नाही. तसेच देशसेवा केल्याने देखील मानवी जीवनाचे सार्थक होते. त्यामुळे देशाची व समाजाची सेवा करु न आपले जीवन सार्थकी लावा असे आवाहन पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रबोधनकार वैकुंठवासी किसन महाराज काजळे यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनातून केले.ज्यांनी आपले जीवन समाजाला तसेच देशाला वाहून घेतले आहे अशाच समाजसेवकांचे तसेच देशभक्तांचे जयंती उत्सव, तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच त्यांचे पुतळे उभारले जातात.म्हणून देशसेवेला प्राधान्य देऊन देशसेवा करून आपली कीर्ती या जगामध्ये मागे ठेवून गेल्यास निश्चितच जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत ‘उत्तमची उरे कीर्ती मागे ’ या उक्तीप्रमाणे तुम्ही किती वर्ष जगला ? यापेक्षा तुम्ही कसे जगला याला विशेष महत्त्व असल्यामुळे आपण गेल्यानंतरही समाजाने आपली आठवण काढली पाहिजे,असे प्रबोधन पाटील यांनी केले.यानंतर पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा केशव महाराज काजळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात पहिले बालसंस्कार शिबीर सुरू करण्याचा मान वैकुंठवासी किसन महाराज काजळे यांना जातो.त्र्यंबकेश्वर येथे पहिले शिबीर सुरू करून त्यांनी महाराष्ट्रात अनेक नामवंत कीर्तनकार, गायक, मृदुंगवादकघडविले आहेत.याप्रसंगी प्रभाकर मुसळे, सोपान मुसळे, रामदास यंदे, संतोष डोळस, सखाहारी काजळे, नामदेव डोळस, किसन यंदे, मोहन धोंगडे, शिवाजी मुसळे, माधव काजळे, दत्तात्रय दिवटे, माजी सैनिक तुकाराम काजळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
देश व समाजाची सेवा करून जीवन सार्थकी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 2:54 PM
नांदूरवैद्य : सदैव संतांच्या सहवासात राहिल्याने जीवनाचा उद्धार होण्यास विलंब लागत नाही. तसेच देशसेवा केल्याने देखील मानवी जीवनाचे सार्थक ...
ठळक मुद्देपुरूषोत्तम पाटील : किसन महाराज काजळे पुण्यतिथी सोहळा