शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

By अझहर शेख | Published: December 16, 2019 5:17 PM

‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज आहे, असेही मुखर्जी

ठळक मुद्देजो पुरुष प्रत्येक नारीचा सन्मान, आदर करतो तोच खरा मर्द महिला, मुलींवर अत्याचार करणाऱ्याला समाजाने धडा शिकवावा,

नाशिक : देशातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणे अनिवार्य क रायला हवे, अशी मागणी अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी केली. शाळा, महाविद्यालयांत आत्संरक्षणाचे धडे मुलींना दिले गेले तर मुली स्वत:चे रक्षण करण्यास अधिक सक्षम होईल. काही पुरूषांच्या विकृतपणामुळे भारतातील पुरूषार्थला डाग लागत अशी खंतही राणीने बोलून दाखविली. जो पुरुष प्रत्येक नारीचा सन्मान, आदर करतो तोच खरा मर्द समजावा. महिला, मुलींना एकटे गाठून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्याला समाजाने धडा शिकवावा, असे रोख ठोक मत राणीने तीच्या खास स्टाईलमध्ये व्यक्त केले.

तरडे यांनी ‘मर्दानी-२’मधून समाजाला दिलेल्या संदेशाबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारताच मुखर्जी यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले, संदेश तर ज्यांना द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत चांगलाच पोहचला आहे. मात्र संपूर्ण समाजाला यामधून महिलांचा आदर, सन्मानाचा संदेश दिला आहे. त्यानंतर त्यांनी पुढे बोलताना सांगितले, ‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज आहे, असेही मुखर्जी यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथक मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, उद्योजक, प्रतिष्ठित संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांगरे पाटील यांनी आयुक्तालयाकडून राबविल्या जात असलेल्या महिला सुरक्षा व जनजागृतीपर उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच राज्यात महिला हिंसाचार, अत्याचाराच्या घटनांचा आलेख प्रास्ताविकातून मांडला. सूत्रसंचालन शिल्पा भोंडे यांनी केले, तर आभार उपआयुक्त अमोल तांबे यांनी मानले.‘स्त्री’ला देव्हा-यात बसवू नका : मुक्ता बर्वेआई देवसमान जरूर आहे; मात्र देव नाही. स्त्रीला देवा-यात बसवू नका तर तिला दैनंदिन जीवनात तिचे हक्क मिळवून द्या, असे मत मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने व्यक्त केले. स्त्री दिसायला नक्कीच सुंदर असते, त्याचा अर्थ तिला बंदिस्त करून ठेवणे असा होत नाही. स्त्रीलादेखील पुरूषांप्रमाणेच समान हक्क, अधिकार देण्यात आले आहे. समाजाने स्त्रीविषयक आपली मानसिकता बदलायची वेळ आली आहे. एखाद्या भावनेची वासना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय व्हायला हवे. समाजाने त्यासाठी भावना ऐकूण घेणारे व्हावे, जेणेकरून विचारांचे व्याभीचारात रूपांतर होणार नाही.

टॅग्स :Rani Mukherjeeराणी मुखर्जीMardaani 2 Movieमर्दानी २Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपWomenमहिलाhyderabad caseहैदराबाद प्रकरणnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील