हिवताप विभागाची भरती बेकायदेशीर
नाशिक : हिवताप विभागामध्ये पन्नास टक्के राखीव जागांवरील आरोग्य सेवकांच्या पदे भरतीप्रक्रि येला स्थगिती असूनही संबंधित विभागाने भरतीप्रक्रिया राबवून २२ कर्मचाºयांची नियुक्ती बेकायदेशीररीत्या केल्याचा आरोप आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाने पत्रकार परिषदेत केला.१९९६ सालापासून आरोग्य विभागात हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून काम करत आहेत. आम्हाला कायमस्वरूपी हंगामी कर्मचारी म्हणून नियुक्तीचे आश्वासन देऊनही तोंडाला पाने पुसली. यासंदर्भात आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रारीही केल्या आहेत; मात्र त्याची कुठलीही दखल अद्याप घेतली गेली नाही. तसेच यापूर्वीचे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी हिवताप विभागात पन्नास टक्के जागा राखीव ठेवाव्या, अशी मागणी हंगामी क्षेत्र कर्मचाºयांनी कामगार न्यायालयात केली. आहे. याबरोबरच पन्नास टक्के राखीव जागांवर कोणत्याही प्रकारची नव्याने भरती करू नये, अशी मागणी या कर्मचाºयांकडून करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत शशिकांत तांबे, निकुंभ आदी उपस्थित होते.