मालेगाव : जळालेले विद्युत मीटर बदलून देण्याच्या कामासाठी यंत्रमाग कामगाराकडून सहा हजारांची लाच स्वीकारताना विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता भरत दगा वाघ यास बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.नसीब हुसेन रा. कुसुंबारोड यांचे विद्युत मीटर महिनाभरापूर्वी जळाल्याने नवीन मीटर बसवून मिळावे यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला होता. नसीब हुसेन यांचेकडे सहाय्यक अभियंता भरत वाघ यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोड होऊन सहा हजार रुाये लाच म्हणून देण्याचे ठरले. जुना मुंबई-आग्रा महामार्गावर अग्निशमन विभागाच्या समोर असलेल्या उपकार सोडा सेंटर या हातगाडीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सायंकाळी पावणेसहा वाजेच्या दरम्यान सहाय्यक अभियंता वाघ यास नसीब हुसेन यांचेकडून सहा हजार रुपये लाच म्हणून स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गांगुर्डे, पोलीस नाईक हांडगे, जमादार जाधव यांनी ही कारवाई केली.
मालेगावी अभियंत्यास लाच घेताना अटक
By admin | Published: February 19, 2015 12:13 AM