अंबादास चौधरीमालेगाव (कलेक्टरपट्टा) : चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या खान्देशातील भाविकांची रिघ लागली असून, रणरणत्या उन्हात आबालवृद्धांसह शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. सप्तशृंगमाते की जय, ‘जय अंबे’च्या जयघोषात भगवे झेंडे खांद्यावर घेत डीजेवर भक्तिगीते वाजवत पायी जाणाºया भाविकांमुळे मालेगावी भक्तीचा मेळा फुुलला आहे. श्रद्धा व भक्तीच्या प्रवाहात सप्तशृंगीच्या चरणी लीन होण्यासाठी धुळे, जळगाव, चाळीसगाव, मालेगावसह मध्य प्रदेश सीमावासीय श्रद्धाळू भक्तांनी मोठ्या उत्साहात दरसालाप्रमाणे यंदाही अनवणी पायांनी सप्तशृंगडाची वाट धरली आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ मानले जाते. त्यामुळेच देवीभक्त भुकेल्या पोटी, अनवणी पायांनी बालगोपालांसह रणरणत्या उन्हात जिवाची पर्वा न करता गडाकडे मार्गक्रमण करत आहेत. गडावर पायी जाणाºया भाविकांची तहान-भूक भागविण्यासाठी शहरातील लोढा कॉलनीतील तरुणांनी गुरूदेव भक्तमंडळाच्या वतीने प्रयत्न केले आहे. पंचवीस वर्षांपासून भक्तसेवा सुरू केली असून, यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जेवण-नास्त्यासह आरोग्य सेवा व पाणपोईचे नियोजन केले आहे. उन्हात अनवणी पायांनी चालणाºया भक्तांना त्रास होऊ नये यासाठी मालेगाव युनिट महाराष्टÑ सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनद्वारे औषधांचे वाटप करण्यात येत आहे. विधायक युवक व्यापारी मित्रमंडळातर्फे शिवाजी पुतळा परिसरात पाणपोईची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर सटाणा नाका येथेसुद्धा तरुणांनी पाणपोईची सोय केली आहे. टपरीधारकांनी बडवे हॉस्पिटलजवळ देवीभक्तांना आराम करण्याासाठी मंडपासह पाणपोईची सोय केली आहे. विविध दानशूर व्यक्ती, संस्था, तरूणाईचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने भक्त मोठ्या उत्साहात जेवण-नास्त्याचा आस्वाद घेत आई भवानीच्या गाण्यांवर ठेका घेत गडाची वाट चालत आहेत. दरेगावपासून टेहरे चौफुलीपर्यंत जाणाºया भाविकांना शहरवासीयांतर्फे पाणी, औषधे आणि फराळासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे. दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत भर पडत असून, सामाजिक संस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.२५ वर्षांपासून भक्तसेवादेवी भक्त भुकेल्या पोटी, अनवणी पायांनी आवश्यक साहित्य घेऊन बालगोपालांसह रणरणत्या उन्हात जिवाची पर्वा न करता गडाची वाट चालू लागले आहेत. त्यांची तहान-भूक भागविण्यासाठी लोढा कॉलनीतील तरूणांनी गुरूदेव भक्त मंडळाच्या वतीने भक्तसेवा सुरू केली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भाविकांसाठी भोजनाासह आरोग्य सेवेचे नियोजन केले आहे.
मालेगावी फुुलला भक्तीचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:15 AM