संगमेश्वर : राष्ट सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिकांचा सन्मान सोहळा येथील या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात सेवा दलाचे राष्टय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांचे प्रमुख उपस्थितीत व राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ५०च्या वर सेवा दल सैनिकांचा सन्मानचिन्ह, शाल व भारतीय संविधानाची प्रत देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संगमेश्वर शाखेच्या बालसैनिकांनी समतेची गिते व नृत्ये सादर केली. सामाजिक सलोख्याचे कार्य सेवा दल करीत आहे. मालेगावसारख्या मुस्लीमबहुल शहरात सेवा दलाचे कार्य अव्याहतपणे सुरू असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन राष्टÑीय अध्यक्ष डॉ. खैरनार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. ९२ वर्षीय रघुनाथ वनाजी जाधव यांच्यासह दत्ता वडगे, अॅड. रामसिंह परदेशी, शिक्षकनेते जे. बी.सोनार, प.फु. देवरे, काशीनाथ लिंगायत, गुलाब देसले, विमलाबेन नवलराय शहा, अरुण जाधव, साजेदा अहमद, प्रदीप कापडिया, डॉ. सुगन बरंठ, भारती पवार, अशोक फराटे, प्रभाकर अहिरे, अशोक पठाडे, व्ही. सी. सोनार, सुभाष पाटील, रहिम शेख, पंढरीनाथ पवार, जयंत गोसावी, यशवंत लिंगायत, रमेश माळी, के. बी. सोन्नीस, बी.के. देवरे आदिंसह ५० ज्येष्ठ कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास सेवा दलाचे राज्य पदाधिकारी विनय सावंत, नचिकेत कोळपकर, सुनीता गांधव, राजाभाऊ अवसन, भास्कर तिवारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक स्वाती वाणी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विकास मंडळ यांनी करून दिला. सूत्रसंचलन डॉ. बरंठ यांनी केले. सत्कारार्थीचा परिचय अशोक फराटे व रविराज सोनार यांनी करून दिला. संतोष पवार यांनी आभार मानले.
मालेगावी राष्ट सेवा दल सैनिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:51 AM