शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मालेगावी ९३ बाधित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 8:43 PM

मालेगाव : शहरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्री तपासणी अहवाल आल्यानंतर त्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने शहरातील रुग्णसंख्या आता ९३ झाली आहे, तर त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव : शहरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्री तपासणी अहवाल आल्यानंतर त्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने शहरातील रुग्णसंख्या आता ९३ झाली आहे, तर त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांची घबराट वाढली असून, रोज येणाऱ्या अहवालाकडे लक्ष लागून आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते भाग सील करण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी बंद करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणू नये, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . किशोर डांगे यांनी केले आहे. सामान्य रुग्णालयात आता सर्वसाधारण रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची तपासणी आणि उपचार आता जीवन, मन्सुराआणि नवीन फारान हॉस्पिटलमध्ये केले जातील, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.---------१६९ जणांवर कारवाईलॉकडाउन जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी पॉइंट लावून रस्ते अडविले होते. विनाकारण फिरणाºया आणि सोशल डिस्टन्स न पाळणाºया १६९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात विनाकारण बाहेर फिरणाºया आणि लॉकडाउन काळात दुकान उघडणाऱ्यांचा समावेश आहे. यात आस्थापना ५१, संचारबंदी मोडून फिरणारे २६ , दूधविक्रेते १३, मेडिकल दुकानात सोशल डिस्टन्स न ठेवणारे सहा आणि गॅस एजन्सीसमोर सोशल डिस्टन्स न ठेवणाºया एकाचा समावेश आहे. मोमीनपुरा, कमालपुरा आणि कुंभारवाडा या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवून कठोर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान १६ वाहने जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक