मालेगाव : निसर्ग चकीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून नागरीकानी घराबाहेर पडू नये घरात आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन केले आहे.निसर्ग वादळामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे तर घरे पडल्याने नुकसान होण्याची शक्यता असल्याने महापालीकेतर्फे खबरदारी घेण्यात आली असून उपाययोजना करण्यात आल्याचे मनपा आयुक्त दीपक कासार यांनी सांगितले,. पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, महा पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात आला असून रुग्ण वाहिका, जेसीबी सज्ज ठेवण्यात आले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरीकाना सुरक्षित स्थळी हलविण्याकरिता शाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. उडणारे पत्रे, फुटणाऱ्या काचा, आणि पडणारी घरे यापासून नागरिकांना वाचविण्याकरिता मनपा यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांना पुरजन्य स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज असलयाचे अग्नीशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांनी सांगितले. नाले सचिन घरांमध्ये पाणी शिरल्यास खाते प्रमुख विभाग प्रमुख यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच नदी काठावर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मालेगाव तालुक्यात ग्रामीण भागात नागरिकांनी खबरदारी घ्यावी सुरक्षित स्थळी जावे पडक्या घरात राहू नये अशी सूचना दवंडी द्वारे देण्यात आली तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.
मालेगावी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:08 PM