लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मनपामार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ मालेगाव शहर शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मागील दोन वर्षांपासून वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता लाभ देण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांचे बांधकाम पूर्ण झाले नाही त्यांनी लवकरात लवकर शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे.प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा किंवा ज्यांच्याकडे शौचालय उपलब्ध नाही त्यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. यापुढे कोणीही उघड्यावर शौचास जाताना, बसताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध मनपातर्फे कायदेशीर व दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिला आहे.
‘मालेगाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट’
By admin | Published: July 10, 2017 11:42 PM