शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जिल्ह्यात मालेगावच ठरले हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:23 PM

मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे.

मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे.मालेगावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन जागे झाले असून इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या, मात्र बैठक आटोपून नाशिकला जात नाहीत तोच एकाच दिवसात १४ रुग्ण सापडल्याने प्रशासन कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लावू शकले नाही. यासंदर्भात डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मालेगावी यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील त्यांच्या नातेवाइकांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आज सापडलेले रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील त्यांचे नातेवाईक आहेत. आज मिळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील अन्य लोकांना उद्या शोधून काढून त्यांना क्वॉरण्टाइन करू. तसेच घरोघर सर्वेक्षण सुरू असून ४५ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मालेगावात पुरेसा औषध साठा असून रुग्ण व्यवस्थितरीत्या हाताळले जात आहेत.दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे म्हणाल्या, आज मिळालेल्या १४ पॉझिटिव्ह रुग्णांना रात्रीच जीवन आणि मन्सुरा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. घरोघर सर्व्हे सुरू असून आज आढळून आलेले रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील नातेवाईक आहेत. हजारखोलीसह इतर भागदेखील सील केला असून प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेकडून अधिक काळजी घेतली जात आहे.-------------मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीनाशिक : मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या जागी नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची तातडीने अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून निकम हे शुक्रवारी (दि.१८) रोजी पदभार घेण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मालेगावची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत मालेगावचे अपर जिल्हाधिकरी राऊत यांना तडकाफडकी हटविण्यात येऊन नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मालेगावच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. निकम यांनी कोरोना संसर्ग रोखण्याविषयी कामकाजाबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुजू व्हावेत असे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, ५०च्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण मालेगावमध्ये आढळले आहेत. त्यामुळे येथील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निकम यांच्यापुढे आहे. निकम यांना तातडीने कार्यभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी राऊत यांना मात्र अद्याप कुठल्याही नियुक्तीबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यांच्या नियुक्तीबाबत यशावकाश आदेश निर्गमित केले जातील, असे शासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती हताळण्यात अपयश आल्याच्या कारणास्तव राऊत यांना हटविण्यात आले असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळवणचे प्रांत डॉ. पंकज आशिया यांना घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक