मालेगाव : शहरात घरफाेड्या करणाऱ्या बीड जिल्ह्यातील दाेघांना आझादनगर पाेलिसांनी चाळीसगाव शहरातून ताब्यात घेतले. यातील एक संशयित अल्पवयीन असून, दुसऱ्याला चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. आझादनगर भागात १४ फेब्रुवारीला मध्यरात्री दुकाने फाेडून ५० हजारांची राेकड लांबविण्यात आली हाेती. पाेलिसांनी घरफाेडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला हाेता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चाेरट्यांच्या हालचालींमुळे पाेलीस तपासाला गती मिळाली. संशयित चाेरटे हे बीड जिल्ह्यातील दाैला वडगावचे असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. हे दाेघेही चाळीसगावला असल्याची गाेपनीय माहिती हाती लागताच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अकबर रुस्तूम खान (वय २५) असे एका संशयिताचे नाव असून, दुसरा संशयित अल्पवयीन आहे. त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अकबरला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पाेलिसांची काेठडी मिळाली. दाेघेही संशयित सराईत चाेरटे असून, त्यांनी अनेक भागांमध्ये चाेऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
मालेगावी घरफाेड्या करणारे बीडचे दाेघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:26 AM