लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा सर्वत्र डांगोरा पिटला जात असताना शहरात बुधवारी एकाच दिवसात ५७ बाधित मिळून आल्याने यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.गेल्या महिनाभरात दिवसाआड पाच ते दहा बाधित आढळत होते. त्यानंतर २० ते ३० बाधित मिळू लागले असताना आज बुधवारी चक्क ५७ बाधित एकाच दिवसात मिळून आले. ५ जुलै रोजी ७७ बाधित रुग्ण उपचार घेत होते, तर महिना भरात ५ आॅगस्ट रोजी ९१ बाधित उपचार घेत आहेत. मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत मालेगावात ९५ कंटेन्मेंट झोन आहेत. नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.बाधितांमध्ये संगमेश्वरच्या मोतीबाग नाका येथील ३८ वर्षीय पुरुष, संगमेश्वरच्या नवा होळी चौकातील ५५ वर्षीय व्यक्ती, सटाणा नाका भागातील ३५ वर्षीय तरुण, कलेक्टरपट्टा भागातील ४७ वर्षीय व्यक्ती, जुना होळी चौकातील २१ वर्षीय तरुण, बागुल कॉलनीतील ६२ वर्षीय महिला बाधित मिळून आले. जुना होळी चौकातील ३५ वर्षीय तरुण, सोयगावच्या मराठी शाळेजवळील २७ वर्षीय तरुण, संगमेश्वरच्या पाटीलवाड्यातील ३२ वर्षीय तरुण, द्यानेतील कुसुंबारोडवरील ४० वर्षीय तरुण, संगमेश्वरच्या पाटीलवाड्यातील ५० वर्षीय महिला, कॅम्पातील मारवाडी गल्लीतील ७८ वर्षीय महिला, ३१ वर्षीय तरुण, २९ वर्षीय महिलाबाधित मिळून आले. संगमेश्वरच्या महादेव मंदिर भागात ५१ वर्षीय व्यक्ती, सायने बुद्रुक येथील ४८ वर्षीय व्यक्ती, मोतीबाग नाका भागातील २६ वर्षीय तरुण, सोयगावच्या अयोध्या-नगरातील ५६ वर्षीय व्यक्ती, काकूबाई बाग येथील ४३ वर्षीय महिला, करीमनगर येथील ५२ वर्षीय महिला, भगतसिंग नगरात ४२ वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय महिला, ११ वर्षाची मुलगी आणि ३६ वर्षीय तरुण बाधित मिळून आले. मनपाने अधिक जागरूक राहण्याची गरजपश्चिम भागात वाढलेल्या दोन महिन्यांपूर्वी मालेगावच्या पूर्व भागात असलेल्या कोरोनाचा कहर आता पश्चिम भागात दिसून येत आहे. पश्चिम भागातील मालेगाव कॅम्प, सोयगाव, सटाणा नाका, कलेक्टरपट्टा, जाजूवाडी, संगमेश्वर या भागासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने कहर केला असून, त्याला रोखण्यात काही प्रमाणात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी करून घाण कचरा उचलल्यास डास मच्छरांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कोरोना रोखल्याच्या आर्विभावात न राहता महापालिकेने अधिक जागरूकपणे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाय योजल्यास कोरोनाला शहरातून हद्दपार करता येणार आहे.
मालेगावात कोरोनाचा पुन्हा वेग वाढला; दिवसभरात ५७ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:34 PM
मालेगाव : मालेगाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा सर्वत्र डांगोरा पिटला जात असताना शहरात बुधवारी एकाच दिवसात ५७ बाधित मिळून आल्याने यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देयंत्रणेपुढे आव्हान : ९५ कंटेन्मेंट झोन; नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर