शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मालेगावी कोरोनाबाधितांची शंभरी पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:42 PM

मालेगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११0 वर पोहोचली असून सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरावरुन भीती व्यक्त होत आहे.

मालेगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११0 वर पोहोचली असून सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरावरुन भीती व्यक्त होत आहे. मालेगावात प्रशासनातर्फे कोरोनाला लगाम घालण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असताना रुग्ण बरे होण्याऐवजी मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनही हादरले  आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि कृषिमंत्री दादा भुसे गेल्या काही दिवसांपासून रोजच आढावा बैठक घेत असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण मिळून आले होते. त्यात ४ मालेगावचे तर १ चांदवडच्या रुग्णाचा समावेश होता. त्यानंतर दोनच दिवसात १० एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ झाली. शहराला लष्कराचेस्वरूप असून, मालेगावात कोरोनाचे ९ रुग्ण आढळल्यानंतर त्या-त्याभागाला सील करून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्ण असलेले परिसरातील रस्ते पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत.----------------------१३ एप्रिलला पहिला बळी४ मालेगावातील २२ वर्षीय महिलेला धुळे येथे शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा १३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने ती कोरोनाबाधित महिला राहत असलेल्या नयापुरा भागाला सील केले तर त्याला जोडून असलेल्या भागालाही बफर झोन म्हणून बंद करण्यात आले.जिल्हास्तरावरील यंत्रणेची धावपळमालेगावी कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर जिल्हास्तरावरील यंत्रणेची एकच धावपळ सुरू झाली. १०७ जणांचे स्त्रावाचे नमुने घेऊन ते तातडीने तपासण्यासाठी पाठविण्यात आले.400 जणांच्या पथकाकडून सर्वेक्षणमालेगाव शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी ४०० जणांचे पथक तयार करून घरोघर सर्वेक्षण सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल झपाट्याने येऊ लागले. त्यांच्या उपचारासाठी जीवन हॉस्पिटल, मन्सुरा हॉस्पिटलसह सायनेतील फार्मसी महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक