मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनी खासगी कंपनीकडे जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याबाबत शहराचा ठेका घेणाºया कंपनीच्या अधिकाºयांच्या शिष्टमंडळाने मालेगावी सर्वेक्षण दौरा केला. त्यामुळे मालेगावी वीज कंपनी खाजगी करणाच्या हालचाली गतिमान झाल्या असल्याने वीज कर्मचारी व त्यास सलग्न संघटनामध्ये अस्वस्थता वाढली आहे तर येत्या महिनाअखेर राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. राज्य महावितरणतर्फे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कळवा उपविभाग अकोला ग्रामीणसह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराची वीज खासगीकरणाच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. २० फेब्रुवारीपर्यंतची मुदत विविध कंपन्यांना निविदा भरण्यासाठी देण्यात आली होती. त्यापैकी एका कंपनीने निविदा भरल्यानंतर मालेगाव शहरात याबाबत आपले अधिकारी पाठवून शहराची सध्याची वीजपुरवठ्यासह शहरातील वीज यंत्रणेची सर्व वीज उपकेंदे्र, वीज खांब, तारा, ग्राहक संख्या व इतर बाबींची सविस्तर माहिती घेतली. या खासगी कंपनीच्या पाच अधिकाºयांनी मालेगावी हातभर मुक्काम ठोकला होता व महापालिका हद्दीतील रस्त्यांचा वीजपुरवठा, समस्या, वीज देयके, वसुली, ग्राहकांशी चर्चा केल्याची माहिती आहे. ह्या सर्व घडामोडींपुढे वीज कर्मचारी व संघटनांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. मालेगावी वीज खासगीकरणासाठी सध्या कर्मचाºयांचा तीव्र विरोध आहे. यात कर्मचारी व वीज ग्राहक दोन्ही भरडले जाणार असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. वीज खासगीकरण विरोधात कर्मचारी व इतर सर्व संघटनांनी अनेकदा निषेध, ठिय्या आंदोलन, मोर्चे आदी काढून निषेध व्यक्त केला आहे व वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांसह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसीफ शेख यांना याबाबत निवेदने दिली. काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री भुसे यांनी याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मालेगाव वीज खासगीकरण करण्यात येऊ नये, असे निवेदन दिले आहेत; परंतु त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. खासगी कंपनीतर्फे निविदा भरल्यावर कंपनी अधिकाºयांनी मालेगावचे याबाबत सर्वेक्षणदेखील केले. यामुळे काही महिन्यात मालेगाव शहराच्या वीज कंपनीच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसणार आहे हे निश्चित असल्याचे वीज अधिकाºयांनी सांगितले. मालेगावी सध्या वीजपुरवठा, वसुली या गोष्टी समाधानकारक असताना खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात विरोध करीत आहोत. खासगीकरणाचा निषेध नोंदवित आहोत; मालेगाव वीज खासगीकरणामुळे कर्मचारी व वीज ग्राहक यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कारण नवीन कंपनीचे नियम अटी सर्वसामान्य ग्राहकांना परवडणार नसल्याचा सूर उमटत आहे. सध्या खाजगीकरणाबाबत वीज ग्राहक अनभिज्ञ आहे. मालेगाव शहर कामगारांचे यंत्रमाग व मुस्लीम बहुल व संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते तर वीज वसुली करतानादेखील वितरण कंपनीला मोठ्या दिव्यातून जावे लागते व अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहिले आहेत. त्यामुळे नवीन वीज कंपनी आल्यास शहरातील वातावरण निश्चितच ढवळून निघणार असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.
मालेगाव : हालचाली गतिमान झाल्याने वीज कर्मचारी-संघटनांमध्ये अस्वस्थता वीज वितरण खाजगी कंपनीकडे जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:07 AM
मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनी खासगी कंपनीकडे जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
ठळक मुद्देसलग्न संघटनामध्ये अस्वस्थता वाढलीअधिकाºयांनी मालेगावी हातभर मुक्काम ठोकला