----------------------
हिंमतनगरात मोबाइल टॉवर न उभारण्याची मागणी
मालेगाव : शहरातील मालेगाव कॅम्पातील हिंमतनगर भागात स.नं. १०३/२ मध्ये मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी संविधाननगर भायगाव शिवार परिसरातील नागरिकांनी केली आहे. या भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. टॉवरमुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. निवेदनावर कैलास बोराळे, दिलीप सोनवणे, रवींद्र शिंदे आदींच्या सह्या आहेत.
-------------------------------------------------------
अल्पवयीन मुलीस पळविल्याची तक्रार
मालेगाव: तालुक्यातील वजीरखेडे येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी संशयिताविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गेल्या गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आले. या प्रकरणी सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. म्हणून पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली.
------------------------------------------------------------------------------
मतदार नोंदणी पारदर्शकपणे राबवा
मालेगाव : शहरातील मतदार याद्यांमधील बोगस मतदार प्रशासनाकडून काढण्यात येत असून, नवीन मतदारांनी नोंदणी करताना पारदर्शकपणे ही मोहीम राबवावी, अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. २० हजार ८४३ बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती प्रांत शर्मा यांनी त्यांना दिली.
-------------------------------------------------------------------------------
अवामी पार्टीकडून शहिदांना अभिवादन
मालेगाव : शहरातील किदवाई रस्त्यावर असलेल्या स्मारकावर सात शहिदांची नावे लिहिण्यासाठी अवामी पार्टीतर्फे करण्यात आलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. यावेळी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी पुष्पवृष्टी करीत अनोखे अभिवादन केले. यावेळी मुजाहिद शाह . शब्बीर अहमद, रज्जाक शाहीद, इस्तियाक अन्सारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.