मालेगाव: महाराष्ट्र गवळी समाज सघंटनेतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून अपर जिल्हाधकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.महाराष्ट्र गवळी समाज सघंटनेचे समन्वयक हंसराज अहिरे, प्रदेश अध्यक्ष हिरामण गवळी, कार्याध्यक्ष अशोक भाले, महासचिव अशोक मंडले, उपाध्यक्ष वसंत नामागवळी व सुनिल नामागवळी यांच्या आदेशावरुन राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर ओ.बि.सी. समाजावर जो राजकीय अन्याय होत आहे त्या वर आवाज उठवण्यात आला.
मालेगाव अप्पर जिल्हाधीकारी व प्रांत,राज्याचे कुषिमंत्री दादा भुसे याना गवळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने याची त्वरीत दखल घेऊन ओ.बि.सी. समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. या वेळी म.ग.स.चे उपअध्यक्ष वसंत गवळी, नगसेवक पापना गवळी, मनमाडचे नगरसेवक कैलास हिरणवाळे, भिमा हिरणवाळे, सतोष गोडंळकर मालेगावचे गोविद गवळी, भगवान पिरनाईक, सुनिल उदिकर, विलास उदिकर,युवराज घुले व गवळी समाजाचे समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.