मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले होते. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली होती.शहरात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने वाढ फिरवली होती. त्या अगोदर ही हवा तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. धरण परिसरात झालेल्या पावसामुळे शहरातील मोसम-गिरणा नद्या काही दिवस खळाळू लागल्या होत्या व सध्या नदीवरील पूर पाणी देखील ओसरले आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा चिंताक्रांत आहे. अद्याप दमदार पावसाची गरज असल्याचे सांगितले जाते. शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून कमालीचा उकाडा वाढला होता. पावसाचे वातावरण तयार होत होते; परंतु पाऊस हुलकावणी देत होता. शनिवारी दुपारी अवकाश झाकोळले व अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.जोरदार सरींनी शहरातील रस्ते, गटारीतून पाणी वाहू लागले. तब्बल एक तासाच्या पावसामुळे परिसरातील वसाहती व कॉलनीमध्ये काही ठिकाणी पाणी तुंबले व परिसर जलमय झाला तर शहरात काही ठिकाणी मुसळधार तर काही परिसरात पाऊस किरकोळ स्वरूपात तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नसल्याचे नागरिकांनी सांगितले. शनिवारी या झालेल्या पावसामुळे घामांच्या धारेने ओले चिंब झालेले नागरिकांनी निश्वास सोडला तर यापूर्वी पेरणी केलेल्या पिकांना या पावसाचा कितपत फायदा होईल याबाबत चर्चा रंगली व अजून चांगल्या दमदार पावसाची मालेगावी प्रतीक्षा होत आहे. (वार्ताहर)
मालेगावी जोरदार पाऊस
By admin | Published: August 27, 2016 11:23 PM